Saturday, December 17, 2011

The decisive Maratha- Afghan war in 1761 at Panipat; Total expenditure 900 Crore Rupees)

One of the most decisive war, which had direct bearing on the history of India in Eighteenth Century, was fought between forces of Maratha Empire and Afghanistan Amir, Ahamad Shah Abdali's forces in 1761 at Panipat in north India. I have read in number of history books the exact number of Maratha Generals and soldiers lost in this battle. Yet, so far no figures were available about the exact monetary expenditure incurred by Maratha Darbar on this campaign, which ran for many number of months. 
Nanasaheb Peshawa ordered his cousin Sadashivrao Bhau to launch a campaign to counter the Afghan Amir , who was moving towards Delhi from Kabul and provided Sadashivrao Bhau with necessary ammunition, army and money. Maratha forces reached Delhi on 1 August 1760 and secured it on 2nd August. On 14th August they had captured the famous Red Fort. 
भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या पानिपतच्या लढाईचा एकूण खर्च किती आला असेल असे वाटते? आतापर्यंत, या लढाईत किती शूर वीर मराठ्यांनी गमावले याची माहिती आपण इतिहासात नेहमीच वाचतो. परंतु ही एवढी मोठी व दीर्घ काल चाललेली मोहिम करण्यासाठी पेशवे दरबारला एकूण किती खर्च आला याचा निश्चित आकडा कोणासच माहीत नव्हता.
अहमद शाह अबदाली दिल्लीवर चालून येत आहे हे समजताच मार्च 19 1760 रोजी सदाशिव राव भाऊ यांना दारूगोळा, सैन्य व आवश्यक तेवढे धन देऊन नानासाहेब पेशवे यांनी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी पाठ्वले होते. 1 ऑगस्ट 1760 ला मराठे दिल्लीला पोचले होते व दुसर्‍या दिवशी त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला होता. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी लाल किल्ला ताब्यात घेतला होता.
अहमद शाह अबदाली आणि मराठी फौज यांच्यातील युद्ध 14 जानेवारी 1761 ला पानिपत येथे लढले गेले होते व या लढाईमध्ये मराठ्यांचा दारूण पराभव झाला होता. युद्धक्षेत्रावर मराठ्यांचा पराभव झाला असला तरी नंतरच्या काळात या मोहिमेवर पेशवे दरबारचा खर्च चालूच होता. पेशवे दरबारच्या हिशोबनीसांनी या युद्धावर झालेल्या खर्चाचा हिशोब अगदी बारीक तपशीलासह लिहून ठेवलेला आहे. या खर्चामध्ये कोणत्या प्रकारचा दारूगोळा मराठ्यांनी वापरला होता? ऊंट, हत्ती यावर किती खर्च झाला होता? याची नोंद आहे. मराठ्यांनी 18 कारखाने युद्धक्षेत्रात उभे केले होते. या कारखान्यात लोहार, सुतार, मिस्त्री आणि मजूर यांच्यावरचा खर्च, सैन्यासाठी गुप्त हेर, न्हावी,शिंपी आणि पहारेकरी यांच्यावरचा खर्च, या सर्व खर्चांची नोंद या हिशोबनीसांनी ठेवलेली आहे.
पेशवे दरबारने या युद्धावर एकूण 92,23,242 रुपये आणि 9 आणे (बाण्णव लाख तेवीस हजार दोनशे बेचाळीस रुपये व नऊ आणे) एवढा खर्च केला होता. या खर्चात 2 ऑगस्टला दिली ताब्यात घेतल्यावर पुढचे साडेतीन महिने शिबंदीवरील खर्च, दिल्लीतील देवळे व मशिदी यांना दिलेल्या देणग्या, संत ,फकिर, मौलवी यांना दिलेली बिदागी यावरील खर्च निराळा दाखवलेला आहे. हा खर्च 14,71,326 रुपये (चवदा लाख एकात्तर हजार तीनशे सव्वीस रुपये) एवढा झाला होता.
1761 ते 2011 या कालातील रुपयाच्या किंमतीतील फरक लक्षात घेतला तर आजच्या रुपयाच्या किंमतीनुसार मोहिमेचा एकूण खर्च 900 कोटी रुपये व दिल्लीतील खर्च 150 कोटी रुपये येतो. पुण्यातील एक इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी नुकतेच काही नवीन मोडी कागदपत्रांचे वाचन केले असता ही माहिती उजेडात आली. हे पैसे मराठ्यांनी कसे उभे केले असतील याची कल्पना या कागदपत्रांवरून येते असे श्री. बलकवडे यांचे मत आहे.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कालात मराठी सत्ता किती वैभवसंपन्न असली पाहिजे याची एक चुणूक या हिशोबामुळे उजेडात आली आहे.
17 डिसेंबर 2011

4 comments:

  1. आपला मराठेकालीन इतिहास अद्याप बराचसा अज्ञात राहिलेला आहे. हे असे संशोधन होणे गरजेचे आहे. त्यातून आपले अनेक गैरसमज, दुराग्रह दूर होण्यास मदत होईल. मात्र होणारे संशोधन डोळस असले पाहिजे तसेच पूर्वग्रह नसलेले असे असावे. अन्यथा त्यातून अकारण कोलाहल माजतो.

    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  2. मनब
    आपण इतिहासाकडे इतिहास म्हणून बघत नाही. आपण त्यातल्या फक्त आपल्याला रुचतील तेवढेच प्रसंग उचलतो.

    ReplyDelete
  3. या युद्धाचे वर्णन डिसिझ्व्ह वॉर असे करणे चुकीचे आहे. कारण यानंतरच मराठे अफगाणिस्तानात शिरले.

    ReplyDelete
  4. शरयू
    पानिपतचे युद्ध हे नेहमीच मोठे निर्णायक युद्ध मानले जाते कारण अतिशय भरात असलेल्या मराठी सत्तेला या युद्धामुळे एक जबरदस्त धक्का बसला होता. या युद्धात जर मराठ्यांचा पराभव झाला नसता तर भारताचा इतिहास फार निराळ्या पद्धतीने लिहिला गेला असता.

    ReplyDelete