Indian social reformer Anna Hajare returned to Delhi's Jantar Mantar ground once again yesterday for a symbolic one day fast. This one day fast might be considered as a continuation of his old marathon fast or a totally new effort. This fast carried out in presence of the leaders of the opposition part leaders on the same platform was bound to be a sore point for the ruling party and they reacted angrily as expected. Yet, this fast proved once again that no one can beat Anna Hajare in playing strategic political moves.
When Anna Hajare had earlier made an announcement of this symbolic fast, many people, including me, were very skeptical about the purpose, objective and what could be achieved by such a fast? However as things turned out, I understand now, how much thinking and planning Anna Hajare must have done to successfully carry out this fast and achieve his objectives.परत एकदा अण्णा हजारे जंतर मंतर मैदानावर काल पोचले. कालचे लाक्षणिक उपोषण म्हटले तर निराळे होते. म्हटले तर पूर्वीच्याच उपोषणाचा पुढचा अध्याय होता. अर्थातच या उपोषणाने आणि विशेषत: अण्णांच्याच व्यासपीठावर असलेल्या विरोधी पक्षांच्या उपस्थितीने, सत्तारूढ पक्षाच्या नाकाला बर्याच मिरच्या झोंबल्या व ते साहजिकच आहे. व्युहात्मक खेळी खेळण्यात अण्णांचा हात कोणीच धरू शकत नाही हे पुन्हा एकदा अण्णांनी दाखवून दिले.
अण्णांनी जेंव्हा या लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली होती तेंव्हा माझ्या सारख्या अनेकांना या उपोषणाने काय साध्य होणार? असे वाटले होते. पण यामागे अण्णांनी किती विचार केला असला पाहिजे, किती प्लॅनिंग केले असले पाहिजे याची जाणीव आज होते आहे. हे लाक्षणिक उपोषण घडण्याआधी काय परिस्थिती होती ते पाहूया. दोन दिवसांपूर्वी संसदेच्या स्थायी समितीने लोकपाल कायद्याबद्दलचा आपला अहवाल सादर केला. त्यात अण्णांच्या अपेक्षेप्रमाणे नोकरशाहीचा मुख्य भाग असलेले क वर्गातील कर्मचारी वगळणे, नागरिक अधिकार चार्टर चा उल्लेख नसणे व पंतप्रधानांना या कायद्यातून वगळणे वगैरे बाबी मुळे या प्रस्तावित कायद्याची धारच काढून टाकण्याचा डाव सरकारी धोरणाचा भाग आहे व जरी हा प्रस्तावित कायदा झाला तरी त्याने भ्रष्टाचार कमी होण्याकडे काहीही उपयोग होणार नाही याची स्पष्ट कल्पना आली. अर्थात अण्णांसारख्या मुरब्बी माणसाला ही अपेक्षा असणारच व त्या दृष्टीने त्यांनी आधीच आपली पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
कालच्या उपोषणाचा महत्वाचा भाग म्हणजे बहुतेक सर्व विरोधी पक्ष अण्णांच्या व्यासपीठावर आले व त्यांनी अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. कायदा करणे हे संसदेचे काम आहे त्यात बाहेरच्या माणसाने पडू नये असे आतापर्यंत संसद सदस्यांचे सर्व साधारण मत होते. परंतु जनमताचा रेटा या बाबतीत किती जबरदस्त आहे याची कल्पना आल्याने का होईना, विरोधी पक्ष या व्यासपीठावर एकत्र आले. यामुळे अण्णांचे आंदोलन हे बाहेरच्या व्यक्तीचे आहे. संसदेचा त्याच्याशी संबंध नाही असे आता कोणी म्हणू शकणार नाही.
विरोधी पक्ष अण्णांच्या व्यासपीठावर आले ते काही मोठे जनहित साधायचे आहे म्हणून नाही. सरकारला अडचणीत आणण्याची आणखी एक संधी त्यांच्यापुढे चालून येते आहे व त्याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे हे लक्षात आल्याने ते काल अण्णांबरोबर दिसले. विरोधी पक्षांची मानसिकता अण्णांच्या लक्षात आलीच असणार व त्याचा फायदा त्यांनी करून घेतला नसता तरच आश्चर्य वाटले असते. विरोधी पक्षांबरोबर अण्णांनी सत्तारूढ पक्षाला निमंत्रण दिलेच होते. अर्थात त्यांना तेथे येणे शक्यच नव्हते.
आपल्या प्रमुख मागण्या विरोधी पक्षांच्या गळी उतरवण्यात अण्णा यशस्वी झाले आहेत हे कालच्या उपोषणाचे खरे महत्व आहे. आता अर्थातच पुढची खरी लढाई संसदेत आहे व विरोधी पक्ष आपलेसे करून घेणे हे अण्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
या शिवाय संसदीय समितीचे काही करून या प्रस्तावित कायद्याची धार कमी करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांना व इतर संसद सदस्यांना लोकमत काय आहे? याची परत एकदा अण्णांनी आठवण करून दिली आहे.
आता अण्णा पुढची खेळी काय खेळतात ते बघायचे!
12 डिसेंबर 2011
या खडाखडीमुळे भ्रष्टाचार थांबवणे एका बाजूला पडत आहे.
ReplyDeleteशरयू-
ReplyDeleteबहुतेक राजकीय पक्षांना भ्रष्टाचार थांबवण्यात खरा रस आहे की नाही या विषयीच माझ्या मनात संभ्रम आहे.