It is said that in the mind of each and every adult, there is always a young boy or a girl, who has all kinds of wishes. Just to fulfill such wishes of young boys or girls inside us, a 'Canopy walk' has been built in Singapore recently.
माझ्या लहानपणी मला ‘टारझन’ची पुस्तके फार आवडत असत. त्याचे ते जंगलामधल्या उंच उंच झाडावरून झोके देत संचार करणे मला एकदम थ्रिल्लिंग वाटत असे. आपल्याला पण असे करता आले पाहिजे असे मला नेहमी वाटे. माझी लहानपणची इच्छा दोन दिवसापूर्वी एकदम पूर्ण झाली. अगदी झोके देत जरी जमले नाही तरी झाडांच्या शेड्यांजवळून चालत, एका झाडापासून दुसर्या झाडापर्यंत व तिथून तिसर्या झाडापर्यंत असे मी चालू शकलो. सिंगापूरच्या केंट रिज पार्कमधे, आपल्या सगळ्यांच्यातच, जो एक लहान मुलगा किंवा मुलगी दडलेली असते, खास त्यांच्यासाठीच हा कॅनपी वॉक तयार केला आहे.
सुरवातीची चढण तर एकदम सोपी!
आता पायाना जरा चढण कळायला लागली!
अरे! बोलता बोलता बरेच वर आलो.
अरे बापरे! अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
हुश्श! वर तर पोचलो. चला आता झाडांच्या शेंड्यांवर.
ग्रेट! झाडांच्या टोकाना हात पण लावता येतो आहे.
वाट आणखी आणखी वळणाची होते आहे.
आता तर घनदाट जंगलातच
पोचलो बुवा जमिनीवर. इथेच बरे वाटते आहे. कसे हे प्राणी सतत झाडांच्या टोकावर कसे रहातात देव जाणे!
No comments:
Post a Comment