While writing this post, I am somehow reminded of these lines from the famous book, 'Alice in Wonderland' written by an author, who took 'Lewis Carrol' as his pseudonym.
"The time has come," the Walrus said,
"To talk of many things:
Of shoes--and ships--and sealing-wax--
Of cabbages--and kings--
And why the sea is boiling hot--
And whether pigs have wings."
The Ultimate linking of totally incoherent things, done superbly in these lines, perhaps may not find any match in English literature. A similar linking of two most inconsistent creatures is being carried on in Hong Kong these days. Yet, it would be difficult to discard this linking as incoherent because behind this linking, there are very strong feelings of the local people. Two weeks ago, a Hong Kong resident saw a Chinese girl, arrived from Mainland China, eating some foodstuff in a Metro train and sternly told her not to do so. Hong Kong Metro, like many of its counterparts in other cities of the world, does not allow consumption of food and drinks in the train. These days, there are large number of immigrants from mainland China in Hong Kong, looking for work. Wide spread resentment was felt by mainland Cinese people in Hong Kong, when they came to know about the incident. The don of literature in Peking University, Mr.Kong Kingdong managed to pour oil into fire by making controversial statement in an online discussion.
हा लेख लिहायला घेताना का कोण जाणे, मला लुई कॅरॉल (Lewis Carroll) हे टोपणनाव घेतलेल्या लेखकाने लिहिलेल्या 'ऍलिस इन वन्डरलॅन्ड' (Alice in Wonderland) या पुस्तकातल्या काही प्रसिद्ध पंक्तींची खूप आठवण येते आहे. या पंक्ती आहेत
"The time has come," the Walrus said,
"To talk of many things:
Of shoes--and ships--and sealing-wax--
Of cabbages--and kings--
And why the sea is boiling hot--
And whether pigs have wings." एकमेकाशी काहीही संबध नसलेल्या अनेक गोष्टींचा या पंक्तींच्यात जो असंबद्ध मेळ घातलेला आहे त्याला बहुदा कोठेही तोड नसेल. हॉन्गकॉन्ग शहरात सध्या असाच एक कुत्री-टोळ वाद संवाद चालू आहे त्याला मात्र असंबद्ध मेळ असे खासच म्हणता येणार नाही कारण त्याच्या मागे लोकांच्या तीव्र भावना आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हॉन्गकॉन्गच्या मेट्रोमधे, चीनहून आलेल्या एका तरूणीला काही खाद्यपदार्थ खाताना एका स्थानिकाने बघितले व असे न करण्याबाबत बजावले. अनेक देशातील मेट्रो प्रमाणे हॉन्गकॉन्गच्या मेट्रोमध्येही खाद्यपदार्थ व पेये यांचे सेवन करण्यास मनाई आहे. हॉन्गकॉन्गमध्ये आता बरेच चिनी लोक चीन मधून काम धंदा मिळवण्यासाठी आलेले आहेत. चिनी मुख्य भूमीवरून आलेल्या या लोकांच्यात, साहजिकच मेट्रोमधील या घटनेने रोष पसरला. पिकिंग युनिव्हर्सिटी मध्ये वाङ्मय विभागाचे प्रमुख असलेले कॉन्ग किन्गडॉन्ग यांनी आंतरजालावरील एका मुलाखतीत काही वक्तव्ये करून आगीत तेलच ओतण्याचे काम केले. या प्रोफेसर महाशयांनी, हॉन्गकॉन्ग रहिवासी चिनी मुख्य भूमीवरील लोकांना कमी दर्जाचे समजतात पण हे रहिवासी खरे तर अजुनही ब्रिटिशांच्या हाताखालची कुत्री आहेत असे सांगितल्याने हॉन्गकॉन्ग रहिवासी अधिकचचिडले आणि आता मुख्य भूमीवरून आलेल्या चिनी लोकांना त्यांनी टोळ म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे. मागच्या आठवड्यात सुमारे 200 हॉन्गकॉन्ग रहिवाशांनी चिनी सरकारच्या हॉन्गकॉन्ग मधील संपर्क कचेरीसमोर (Liaison Office) निदर्शने केली. याच्या आधी गरोदर स्त्रिया व लहान बालकांना घेऊन आलेल्या माता यांच्यासह सुमारे 1500 हॉन्गकॉन्ग रहिवाशांनी चिनी मुख्य भूमीवरून हॉन्गकॉन्गमध्ये येणार्या लोकांविरूद्ध, एक मोर्चा काढला होता.
हॉन्गकॉन्ग मधून आंतरजालावर 'लोकस्ट वर्ल्ड' (Locust World) या नावाचा एक व्हिडियो प्रसारित झाला आहे. या व्हिडियोत मुख्य भूमीवरून आलेली ही चिनी मंडळी उपहारगृहात आरडाओरड करतात व आपल्या मुलांना रस्त्यावर घाण करू देतात या बद्दल त्यांना बदडून काढले पाहिजे असे सुचवले आहे.
आंतरजालावरचे एक चर्चास्थळ ' हॉन्गकॉन्ग गोल्डन फोरम' (Hongkong Golden Forum) याचे सभासद हॉन्गकॉन्गच्या रहिवाशांमध्ये या विषयाबद्दल जागृती करण्यासाठी, ऍपल डेली, साउथ चायना मॉर्निंग पोस्ट, सारख्या प्रमुख वृत्तपत्रांत मुखपृष्ठावर जाहिराती देण्याच्या विचारात आहेत. त्यांनी 5 दिवसात 40000 हॉन्गकॉन्ग डॉलर्स आतापर्यंत या साठी जमवले आहेत.
ब्रिटिश वसाहत असलेले हॉन्गकॉन्ग चीनच्या ताब्यात परत दिले गेल्याला 15 वर्षे झाली असली तरी हॉन्गकॉन्गचे रहिवासी व मुख्य भूमी वरील चिनी लोक यांच्यात फारसे सख्य निर्माण होऊ शकलेले नाही. चिनी लोकांना हा हॉन्गकॉन्गवासियांचा अहंगंड आहे व मुख्य भूमीवरील चिनी लोकांबद्दल वर्णभेद दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असे वाटते. तर हे बाहेरून आलेले चिनी येथे येऊन हॉन्गकॉन्गमधील उत्कृष्ट दर्जाच्या वैधकीय सेवांचा फायदा घेत आपल्या मुलांना येथे जन्माला घालतात व हॉन्गकॉन्गमध्ये वास्तव्य करण्याचा परवाना मिळवतात असे स्थानिकांना वाटते आहे.
हॉन्गकॉन्गवासी चिनी लोकांपेक्षा निराळे आहेत. त्यांच्या आयुष्याची मूल्ये, शिस्तप्रियता, ही चिनी लोकांपेक्षा भिन्न आहेत अशी भावना गेल्या 15 वर्षात कधी नव्हती तेवढी वाढीस लागली आहे. काही लोक तर हॉन्गकॉन्ग स्वतंत्र असले पाहिजे असे मत व्यक्त करत आहेत. हा वाद कमी न होता उफाळून येण्याचीच जास्त चिन्हे दिसत आहेत.
शहरी व ग्रामीण या सारखा भेद प्रत्येक शहरात दाखवला जातोच. पूर्वी पुण्यात सुद्धा " काय पौडावरून आला का?" अशी हेटाळणी होत असे. मुंबईला अजुनही मराठी माणसाला "घाटी" म्हणून हेटाळणीवजा पुकारलेच जाते. त्यातलाच हा वाद आहे. फक्त हॉन्गकॉन्गच्या वैशिट्यपूर्ण " एक राष्ट्र- दोन राजकीय पद्धती" मुळे (One Nation-Two systems) हा वाद वकर मिटेल असे वाटत नाही.
27 जानेवारी 2012
No comments:
Post a Comment