Present day Hindu religion attributes a place of great honour to the elephant headed God, Lord Ganesha. He is believed to be a protector of mankind from all evils. For this reason, in any of the Hindu religious ceremonies, Innovation to Lord Ganesha is done at the beginning, so that the ceremony could be completed without hindrance of any kind. Lord Ganesha is also considered as God of intelligence. Staunch Hindu's believe that worshiping Lord Ganesha, would bring happiness in their life. Ganesha is one God, which can adopt to any attire or appearance. In the city of Pune, a festival of Lord Ganesha is celebrated every year. For 10 days, huge images of the Lord are installed and worshiped. In the images or idols displayed, Lord Ganesha can appear in any attire or form, relevant at that time. Sometimes he may look like a wrestler or like a soldier with his sword and shield, all ready for a battle. Sometimes he is seen as Lord Rama or Krishna, He may be all set sometimes, for a fight across borders of India or even for a fight against corruption.
हिंदू धर्मातील समजुतींप्रमाणे, गणेश किंवा गणपती या देवाचे स्थान मोठे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. गणेश विघ्नहर्ता असल्याने कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना गणेशाचे पूजन केले जाते. गणेश ही बुद्धीदेवता मानली जाते, त्याचप्रमाणे गणेशाचे पूजन केल्यास दुख: हरण होऊन सुख प्राप्त होते असे मानले जाते. गणेश ही एकच अशी देवता आहे जी कोणतेही रूप धारण करू शकते. पुण्याच्या गणेशोत्सवात जाऊन बघितले की या देवतेची अक्षरश: हजारो रूपे बघायला मिळतात. कधी गणपती कुस्तीगीरासारखा दिसतो तर कधी ढाल-तलवार घेऊन लढायला निघालेला दिसतो.
पूर्वीच्या काळी कोकणात दशावतार दाखवणारी नाटके होत असत. या नाटकात सुद्धा गणपतीचे सोंग घेतलेला नट प्रथम रंगमंचावर येत असे. पण हा नाटकातला गणपती आता ऑस्ट्रेलिया मधल्या रंगमंचावर पोचला आहे असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? आणि तिथल्या कोणा हिंदू समाजाच्या फक्त सभासदांना सादर केल्या गेलेल्या नाटकात हा गणेश दिसत नाहीये. ऑस्ट्रेलिया मधील व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहराचा एक भाग असलेल्या, साऊथबॅन्क येथेल मर्लिन थिएटर मधे, हे गणेशाचे नाटक सप्टेंबर 29 ते ऑक्टोबर 9, 2011 , या काळात प्रेक्षक बघू शकणार आहेत. या नाटकाचे नाव आहे. ‘ गणेश विरूद्ध थर्ड राइख‘ (“Ganesh Versus the Third Reich”)! ब्रूस गाल्डविन या दिग्दर्शकाने हे नाटक दिग्दर्शित केले आहे.
या नाटकाची गोष्ट साधारणपणे अशी आहे. स्वस्तिक हे चिन्ह गणेशाला अतिशय प्रिय असल्याने तो त्याचे सतत रक्षण करत असतो. जर्मनीतील, हिटलर किंवा नाझी राजवटीतील काही जण हे स्वस्तिक चिन्ह गणेशाकडून पळवून नेतात. ते परत आणण्यासाठी गणेश नाझी जर्मनीमध्ये जातो. तेथे नाझी त्याला पकडून त्याची चौकशी व शारिरीक हाल करू पाहतात. परंतु गणेश या सर्वांवर व हिटलरवर विजय मिळवून स्वस्तिक परत मिळवतो.
आपल्या पुराणांच्यात वगैरे असलेल्या गणपतीच्या गोष्टींसारखीच ही गोष्ट आहे. मात्र राक्षसांच्या ऐवजी येथे नाझी व हिट्लर यांना घेतले आहे. परंतु काही परदेशी स्थायिक असलेल्या हिंदू समाजातील लोकांना या नाटकाची गोष्ट आवडलेली नाही. अमेरिकेमधील नेवाडा राज्यातील Universal Society of Hinduism या संस्थेचे अध्यक्ष राजन झेड याच्या मते गणेश या देवतेचे मंदिरातच पूजन करणे योग्य आहे. त्याला रंगमंचावर आणून, त्याच्या अवताराकडे बघून प्रेक्षकांनी हसणे योग्य ठरणार नाही. हिंदू धर्मग्रंथांच्यात दाखवल्याप्रमाणे त्याची रूपे चित्रपटात किंवा रंगमंचावर दाखवण्यात काहीच गैर नाही. मात्र स्वत:च्या कल्पनेने “नाझी जर्मनीतील त्याचे हाल ” वगैरेसारख्या नाटकी परिस्थितीत गणेशाचे प्रदर्शन करू नये. यामुळे गणेशभक्तांच्या भावनांना मोठी हानी पोहोचण्याची शक्यता वाटते. राजन झेड पुढे म्हणतो की ऑस्ट्रेलिया कौन्सिल फॉर आर्टस या सारख्या लोकांच्या पैशांवर चालणार्या संस्थांनी या बाबतील लोकांच्या भावनांची कदर केली पाहिजे. ऑस्ट्रेलियात हिंदू देवांची चेष्टा करण्याचे प्रकार अलीकडे वाढत चालले आहेत असे श्री. राजन यांचे म्हणणे आहे. सिडनी येथे झालेल्या एका पोहण्याच्या कपड्यांच्या फॅशन शो मधे या कपड्यांवर लक्ष्मी या देवतेची चित्रे छापलेली होती. काईल सॅन्डीलॅन्डस या रेडिओच्या अनाउन्सरने कही दिवसांपूर्वी हिंदूची बदनामी करणारे उद्गार काढले होते. त्यांच्याविरूद्ध बर्याच तक्रारी आल्यावर या दोन्ही ठिकाणी हिंदूंची माफी मागितली गेली होती.
या नाटकात गणेशाचे रूप कसे दाखवले आहे हे नाटक बघितल्याशिवाय सांगणे खूपच कठिण आहे. मात्र कोकणातल्या नाटकांत गणपती जसा दाखवला जातो त्या पद्धतीने तो या नाटकात दाखवला असला तर त्यात काही गैर आहे असे म्हणता येणार नाही. मात्र राजन झेड म्हणतात तसा प्रकार असला तर या नाटकावर बंदी घालणेच उचित ठरावे.
20 सप्टेंबर 2011
No comments:
Post a Comment