A world wide survey of the environmental performance of nations was presented at the 'World Economic Forum' in Davos, Switzerland, recently. The study called as 'Environmental Performace Index 2012' was conducted by 'The Yale Center for Environmental Law and Policy and Columbia's Center for International Earth Science Information Network' from Yale and Columbia universities, USA.
After observing performance of 132 countries on 22 different environment related parameters, these were combined to give rankings for nations on various environmental sectors.These 10 sectors are given below along with India's rank in each sector.
अमेरिकेतल्या येल आणि कोलंबिया विद्यापीठांतील The Yale Center for Environmental Law and Policy and Columbia's Center for International Earth Science Information Network या दोन विभागांनी नुकतेच एका जागतिक पहाणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. Environmental Performance Index 2012 या नावाचा हा अहवाल, स्विट्झरलॅन्ड मधील डाव्होस गावात सध्या चालू असलेल्या World Economic Forum मध्ये सादर करण्यात आला.
पर्यावरण संबंधित निरनिराळ्या प्रकारची 22 निरीक्षणे करून खाली दिलेले 10 गट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटात भारताला मिळालेला क्रमांक पुढे दिला आहे.
• Environmental Burden of Disease - 110
पर्यावरण संबंधित निरनिराळ्या प्रकारची 22 निरीक्षणे करून खाली दिलेले 10 गट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटात भारताला मिळालेला क्रमांक पुढे दिला आहे.
• Environmental Burden of Disease - 110
• Water (effects on human health) -104
• Air Pollution (effects on human health) - 132
• Air Pollution (ecosystem effects) -73
• Water Resources (ecosystem effects) - 122
• Biodiversity and Habitat - 97
• Forestry - 21
• Fisheries- 35
• Agriculture - 126
• Climate Change- 55
यापैकी प्रत्येक गटाखाली, 132 देशांचे क्रमांक या अहवालात लावलेले आहेत. भारतातील एकूणच दूषित हवामान, पर्यावरणासंबंधीची आपली एकूण अनास्था बघता, भारताचा क्रमांक या यादीत शेवट्च्या काही देशांत असणार हे भारतात राहणार्या कोणालाही सहजपणे लक्षात येईल. या पाहणीतील काही रोचक निरीक्षणे अशी आहेत.
सर्व 22 निरिक्षणे किंवा 10 गट एकत्रित करून लावलेल्या यादीत भारताचा क्रमांक 125 वा आहे. चीनचा क्रमांक या यादीत 116 वा आहे. भारताखाली या यादीत कुवेत, येमेन, दक्षिण आफ्रिका, कझाखस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान व इराक हे देश आहेत.
मानवी आरोग्यावर होणारा प्रदुषित हवेचा परिणाम (terms of air quality with regard to its effect on human health.)-- भारताचा क्रमांक शेवटचा 132 (मिळालेले गुण 3.73/100). सबंध दक्षिण एशिया व चीन या निरिक्षणात शेवटच्या 5 स्थानांवर आहेत. चीन-128, पाकिस्तान -129, बागला देश- 130
जंगले, मत्स्यव्यवसाय, हवेतील प्रदुषण व जैविक वैविध्यता या गटात जरी भारताचा क्रमांक वर असला तरी जल स्रोतांचा मानवी जीवनावरील परिणाम, शेती या गटात भारत बर्याच खालच्या क्रमांकावर आहे.
प्रदूषणामुळे भारतातील जीवनमान कसे खालावत चालले आहे याचा अनुभव भारतात राहणार्या प्रत्येकाला येतोच आहे. फक्त या खालावलेल्या जीवनमानाला, या अहवालानुसार आकड्यांमध्ये आणले आहे. ज्या पद्धतीने भारतात पर्यावरणाचा र्हास सतत चालू आहे तो बघता या यादीत भारताचा क्रमांक वर येण्याची शक्यता पुढील काही वर्षांत तरी धूसरच आहे.
31 जानेवारी 2012
हे क्रमांक भारतातल्या तथाकथित परयावरणप्रेमीना बिथरवण्यासाठी लावलेले आहेत.
ReplyDeleteशरयु-
Deleteम्हणजे भारतातील पर्यावरण उत्कृष्ट दर्जाचे असून हे आकडे खोटे आहेत असे तुमचे म्हणणे आहे का?