Having spent my entire professional career in manufacturing industry, that dealt with electronic products, the information technology industry from a commercial angle, remains always a big question mark in my mind. I use a computer and internet. As a user and consumer of these services, I like and enjoy the facilities and conveniences given to me by companies like Face book, Twitter and Google. Yet, I am always puzzled by the fact that how these companies really earn hard dollars required for maintenance. Out of these companies, I am aware that Google earns it's revenue through advertisements. But for remaining companies that offer free services on the net, I just do not understand how they pay salaries and wages, pay electricity bills and rent. I have still to find a satisfactory answer for my doubts. I find it easier to understand the accounts and balance sheets of manufacturing companies, who earn revenue from old fashioned sales of goods.
Because of this, I read bit carefully, news about the results of the electronic manufacturing giant, 'Apple Computers' for last quarter. This very secretive monolith, actually sold 37 Million I Phones in last quarter. The company has now accumulated cash reserves (which also includes securities) well over 100 Billion US Dollars.
However, I can clearly see. that besides the company and it's shareholders, who are obviously the largest gainers, the spoils are also shared by foreign supplier companies like Samsung, Quallcomm and Toshiba. Another big beneficiary is a firm named as Foxconn, who does all assembly work for Apple. I feel that this is the real tragedy for American nation and its people. Economist magazine, commenting about this says, माझे व्यावसायिक आयुष्य मी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात व्यतीत केलेले असल्यामुळे, माहिती तंत्रज्ञान उद्योग हा माझ्या मनात नेहमीच एक यक्षप्रश्न म्हणून राहिलेला आहे. संगणक मी वापरतो. या तंत्रज्ञानाने मिळालेल्या सुविधा सुद्धा एक उपभोक्ता म्हणून मला अतिशय आवडतात. तरीही या सुविधा देणार्या आंतरजालावरच्या फेसबूक, ट्विटर किंवा गुगल सारख्या कंपन्या, उत्पन्न कोठून व कसे मिळवतात? हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येतो. यापैकी गुगलच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत जाहिराती हा आहे हे मला माहिती आहे परंतु फेसबूक व ट्विटर आपल्या कर्मचार्यांचे पगार कोठून करतात? किंवा इमारतीचे भाडे, वीज खर्च कोठून करतात? असे मूलभूत प्रश्न मला वारंवार पडत असतात. अजुन तरी मला या प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. या कंपन्यांच्या मानाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी मी समजू शकतो.
म्हणूनच काल ऍपल या कंपनीने मागच्या तीन महिन्याचा आपला ताळेबंद सादर केल्याची बातमी मी जरा काळजीपूर्वक वाचली. मला थोडेफार समजत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रातील ही एक विशाल कंपनी या आंतरजालावरील कंपन्यांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात उत्पादनाचा व्यवसाय करून फायदा मिळवते आहे हे वाचून मला नाही म्हटले तरी आनंद वाटला. या मागच्या 3 महिन्यात ऍपल कंपनीने 3.7 कोटी आयफोन विकून एक उच्चांकच प्रस्थापित केला आहे. या कंपनीकडे आता 100 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम रोख किंवा गुंतवणूक या स्वरूपात जमली आहे.
मात्र ऍपल कंपनीच्या या अद्भुत म्हणता येईल अशा कामगिरीचा खरा फायदा अमेरिकेतील उद्योग जगताला न होता सॅमसुंग, क्वॉलकॉम, टोशिबा यांच्यासारख्या घटक मालाचा पुरवठा करणार्या कंपन्या व ऍपलच्या उत्पादनांची प्रत्यक्ष जुळणी करणार्या फॉक्सकॉन सारख्या कंपन्यांना होतो आहे ही अमेरिकेच्या दृष्टीने खरी शोकांतिका आहे असे मला वाटते. या बाबतीत टिप्पणी करताना इकॉनॉमिस्ट पाक्षिक फॉक्सकॉन कंपनीबद्दल म्हणते की
“The facility has 230,000 employees, many working six days a week, often spending up to 12 hours a day at the plant. Over a quarter of Foxconn’s work force lives in company barracks and many workers earn less than $17 a day. When one Apple executive arrived during a shift change, his car was stuck in a river of employees streaming past. “The scale is unimaginable,” he said. Foxconn employs nearly 300 guards to direct foot traffic so workers are not crushed in doorway bottlenecks. The facility’s central kitchen cooks an average of three tons of pork and 13 tons of rice a day. While factories are spotless, the air inside nearby tea houses is hazy with the smoke and stench of cigarettes. Foxconn Technology has dozens of facilities in Asia and Eastern Europe, and in Mexico and Brazil, and it assembles an estimated 40 percent of the world’s consumer electronics for customers like Amazon, Dell, Hewlett-Packard, Motorola, Nintendo, Nokia, Samsung and Sony.“They could hire 3,000 people overnight,” said Jennifer Rigoni, who was Apple’s worldwide supply demand manager until 2010, but declined to discuss specifics of her work. “What U.S. plant can find 3,000 people overnight and convince them to live in dorms?”
ऍपल फोनमध्ये वापरल्या गेलेल्या घटकांपैकी एक घटक म्हणजे मुखपृष्टावर वापरलेली कठिण काच हा आहे. हा घटक, कॉर्निंग ही अमेरिकन कंपनी बनवत असली तरी तो बनवला जातो चीन, कोरिया सारख्या देशातच. त्यामुळे अमेरिकन उद्योग जगताला त्याचा फायदा कमीच होतो.
ऍपल कंपनी, तिचे शेअर होल्डर यांचा या उलाढालीत खूप फायदा होतो आहे हे सत्य आहे परंतु ही कंपनी जिथे व्यवसाय करते आहे तिथल्या म्हणजे अमेरिकेतील लोकांना या कंपनीच्या व्यवसायाचा काहीच फायदा होत नाही हे तितकेच खरे आहे.
टाटा मोटर्स किंवा बजाज ऑटो या उत्पादन करणार्या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे मोठे कारखाने महाराष्ट्रात आहेत. उत्पादनास लागणारे मनुष्यबळ किंवा माल पुरवठादार हे भारतातले आहेत. म्हणजेच या कंपन्या करत असलेल्या उत्पादनाचा उपयोग या कंपन्यांत काम करणार्या कर्मचार्यांचे जीवनमान वाढण्यासाठी तर होतोच आहे पण या शिवाय हे कारखाने आहेत त्या शहरांचे जीवनमान सुधारण्यासाठीही होतो आहे. या कंपन्यांचे स्थानिक पुरवठादार भारतीय कंपन्या असल्याने त्यांचाही फायदा होतो आहे. उद्या टाटा मोटर्सनी नॅनो गाडी श्री लंकेत किंवा बांगला देश मध्ये बनवून भारतात आयात करण्यास सुरूवात केली तर भारताच्या दृष्टीने त्याचा काहीच फायदा होणार नाही. फक्त कंपनी व शेअर होल्डर तेवढे गब्बर होतील.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची गोष्ट थोडी निराळी आहे असे मला वाटते. या कंपन्यांपैकी काही कंपन्या एका विशिष्ट ग्राहकासाठी (उदा. संरक्षण, बॅंका) प्रणाली बनवतात तर काही आंतरजालावर उपयुक्त अशा प्रणाली बनवत असतात. इन्फोसिस सारखी कंपनी जेंव्हा दुसर्या देशात एखादे केंद्र सुरू करते तेंव्हा या कंपनीचा प्रभाव तिथे काम करणार्या हजार पाचशे लोकांपुरताच मर्यादित रहात असतो. देशावर, समाजावर होणारा या कंपन्यांचा प्रभाव फारच मर्यादित असतो.
माहिती तंत्रज्ञान उद्योग व इतर उद्योग या मधला मुख्य फरक हाच आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग भारतात राहिले किंवा बाहेर गेले तरी त्याचा येथील समाजावर, देशावर फारसा परिणाम होणार नाही मात्र इतर उत्पादन करणारे उद्योग देशातच असणे महत्वाचे आहे. सेवा किंवा माहिती उद्योगांचे Outsourcing हे पुष्कळदा फायदेशीर ठरू शकते. मात्र उत्पादन उद्योग देशाबाहेर घालवणे ही फार मोठी चूक असू शकते. जर्मन किंवा जपान मधील मोठ्या उत्पादकांचे काही कारखाने बाहेरील देशात असले तरी बरेचसे उत्पादन हे देशांतर्गत होत असते.
कदाचित माझे विचार जुन्या पठडीतील असल्याचे काही जणांना वाटेल पण हे ऍपल मॉडेल भारतासारख्या देशाला उपयुक्त तर नाहीच पण येथील उद्योगधंद्यांना हानीकारकच आहे असे मला खात्रीकारकपणे वाटते.
27 जानेवारी 2012
The reason behind this is intallectual property law in USA. Hope it will not be repeated in India
ReplyDeleteSharayu-
DeleteThanks for your comment